Wednesday, 29 July 2015

कधीच नाही जात

   एकदा काही जणांबरोबर देश , समाज ह्या गोष्टींवर चर्चा करत असताना नकळत मुद्दा घसरला तो 'जात' ह्या विषयावर . त्या लोकांच्या मते जात ,पात ,धर्म व पंत असे काही नसते . आजकाल सर्वांना , उपहारगृह , सिनेमागृह आणि इतर सर्व सामाजिक स्थळे इथे प्रवेश मिळतो . निरनिराळ्या जातीची लोक एकत्र बसून भोजन देखील करतात. ट्रेन , बस आणि इतर सार्वजनिक वाहनात अगदी पाठीला पाठ लावून प्रवास करतात. कोणी चालत्या लोकल ट्रेन मधून पडत असेल तर आपसूक हात देतात तिथे जात ह्या गोष्टीचा कोणीच विचार करत नाही . हल्ली बरेच आंतरजातीय विवाह होतात . बहुतेक सर्व लोकांना नोकर्या मिळतात , उपजीविकेचे साधन मिळते , कोणाचा कोणाला विटाळ होत नाही , सगळ्या लोकांना समान अधिकार आहेत . जात आणि जातिभेद असा कोणताच प्रकार उरला नाही आपल्या देशात . हे पुस्तकी वक्तव्य ऐकल्यावर मी इतकंच बोललों महाशय आपल्या मनातून तरी जात गेली आहे का ? भूतलावर जन्माला येताना आपण आपली जात घेवून येतो . आडनावावरून कोण कोणत्या जातीचे आहे ते लगेच कळते . आडनाव हा फार दूरचा विषय आहे इथे माणसाने प्राणी , पशुपक्षी, निर्जीव वस्तू ह्यांना सुद्धा जातीत वर्गीकरण करून ठेवले आहे . एक सोपं उदाहरण आहे आपण घरी कुत्रा पाळतो , त्याच्या वेगवेळ्या जाती असतात जसे  " जर्मन शेपर्ड , दोबर्मन , अल्सेशन" इ परंतु जे रस्त्यावर फिरतात , रानात वनात असतात त्यांना आपण भटके कुत्रे म्हणतो . इथे पाळीव आणि भटके हे दोन्ही कुत्रेच आहेत मग ह्यात जात का ? ह्यातून एक सिद्ध होते मानवाला जात पाडणे ही  जन्मजात जडलेली सवय आहे , पाळीव असो कि भटके असो त्यांना काय माहित आहे त्यांची जात कोणती ?
         जात ही संकल्पना माणूस जे काम करतो किंवा जो व्यवसाय करतो ह्यावर अवलंबून असते , जसे शेती करतो तो शेतकरी किंवा कुणबी , मातीची भांडी बनवणारा कुंभार , केस कापणारा न्हावी , पुजा करणारा पुजारी ह्या प्रकारे यादी वाढत जाते ह्याचा अर्थ जात आणि जातीयवाद हा माणूसच निर्माण करतो. ज्यावेळी माणसाच्या मनातून जात नाहीसी होईल तेव्हा ती समाजातून नाहीसी होईल . जात ही माणसाचा मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही. शाळेत गेल्यावर आपल्याला जात म्हणजे काय ते समजते कारण ती शाळेच्या दाखल्यावर चिकटलेली असते . पुढे कॉलेज ला गेल्यापासून ते आयुष्यभर ती आपल्यासोबत असते . बहुतेक लग्नविषयक जाहिरातीमध्ये हेच नमूद केलेले असते वधू किंवा वर पाहिजे स्वजातीय असावा . शिक्षणाने माणूस हुशार होतो पण शहाणा होत नाही . जात हा प्रकार समाजातून घालवण्यासाठी माणसाने शहाणे असायला हवे .
        जातीबरोबर लोकांना जातीवरून संबोधने  जोडली जातात . काही लोकांना ती संबोधने जोडून घेणे मोठेपणाचे वाटते. काही तमाशा कलावंत त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत स्वजातीचा उल्लेख करत असत . कचरू , दगडू , गणपा इ अशी नावे जातीनुसार ठेवली जात आणि आजही ग्रामीण भागात लोकांना प्रथम नाव आणि जात ह्याने संबोधले जाते . काही लोक शिकली आहेत ती आपले नाव आणि वडिलांचे नाव ह्याची फक्त अद्याक्षरे वापरतात आणि आडनाव लिहतात . काहीजण आडनाव सुध्धा बदलून टाकतात . इतका सगळा बदल करून सुद्धा जातीचा पगडा कायम असतो , शिक्षण , सरकारी नोकरी इथे जातीचे आरक्षण असते . जातीचे आरक्षण हे समाजाचा स्तर समान व्हवा ह्यासाठी असते . त्याचा कित्येकजण उपयोग करतात आणि दुरुपयोग करतात ते त्यांनाच ठावूक . आपल्या देशात लोकशाही असून सुद्धा निवडणूक काळात बरीच मते ही जातीवर विभागली जातात . जातीचे राजकारण केले जाते. जातीवरून लोकांच्या भावना भडकावल्या जातात आणि एवढे सगळे करूनही शेवटी काहीच साध्य होत नाही .
      जातीयता ही मानवाची मानवाकडून गळाचेपी करत आहे . आणि मानवाला विकासापासून दूर लोटत आहे. परिणामी जनमनात विषमता पसरत आहे . मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे व माणुसकी हि सर्वात मोठी जात आहे . जात ह्या विषयावर खूप जणांनी खूप काही लिहले , खूप प्रोबोधन केले , नाटक , सिनेमे पण निघाले खूप चळवळी झाल्या . काहीना यश आले , आजही जात ह्या विषयावर संघर्ष चालू आहे . लोकांची मानसिकता बदलणे अनिवार्य आहे यथावकाश प्रयत्नांना यश येईल . सर्व समाज गुण्यागोविंद्याने राहील . माणूस माणसाला मनापासून माणूस म्हणेल . समता आणि बंधुता नांदेल . तूर्त हे कटू सत्य पचवावे लागेल ' जी कधीच जात नाही ती जात ' 

© सागर शिंदे (सिंधिया)
चित्र सौजन्य : गुगल


Friday, 26 June 2015

२६ जून नाशमुक्ती दिन
 
         " ए भाय  इधर दो कटिंग और दो सिगरेट भेज देना…………  " ही आरोळी रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येक नाक्यावर ऐकू येते , " ए बारक्या जरा डबल बार (तम्बाकूची गोळी ) बनव रे जरा ट्राफिक आहे तोवर " .  " ओ भाऊ जरा काडीपेटी आहे का ? उदबत्तीचा टायम झाला ".  " ओ राव जरा  उलशिक तंबाकू 
द्या की ".  " excuse me may  have a light " . आज शाम को किधर बैठ्ने का हे ?
    ह्या प्रकारची वाक्ये रोज सर्रास ऐकू येतात इतका काय त्यात अर्थ नाही , पण जर नीट विचार केला तर लक्ष्यात येईल की ह्यात काही तथ्य आहे . किती सहजपणे हे लोक आपल्या आरोग्यची हेळसांड व्हावी अशी वाक्ये उच्चारत असतात पण ह्यांना जाणीव नसते की , ह्या गोष्टी खरच इतक्या महत्वाच्या आहेत ? ह्यातून सध्य काय होते ? आज कोणता व्यसन करणारा माणूस चांगल्या वाटेवर आहे ? तो खरचं सुखी आहे का? तर उत्तर येईल नाही . तरी असं काय आहे ह्या व्यसनात की  माणूस त्याच्या आहारी जातो ?
     हे प्रश्न रोज सतावत असतात , पण नेमक उत्तर कधी सापडत नाही आणि जरी ते सापडल तरी ते आचरणात आणायची तयारी मात्र नसते. नशा हे एक असे रसायन आहे कि ते कधी , धर्म, जात-पात , गरीब -श्रीमंत असा कोणताही भेदभाव करत नाही ते कोणालाही भक्ष्य करू शकते . आणि एकदा का त्याने भक्ष्य केले कि त्यातून बाहेर पडणे सहज शक्य नसते . बर हि व्यसन माणूस का लावून घेतो ? कारण तो मनांन कमजोर असतो. परीक्षा पास झालो सेलिब्रेशन पार्टी इथे पार्टी म्हणजे मेजवानी नाही तर दारू आणि इतर गोष्टी ह्याला पार्टी म्हणतात . आरे काल तिला प्रपोज केला ती हो म्हणाली " अरे यार पार्टी " काल मन्याच ब्रेक -अप झालं ' अरे यार बहुत बुरा हुवा चलो रम में गम भुलते है ' इलेक्शन आले उमेदवार रोज दारू , चला ………।
          guys tommrow there is a party about grand success of company , ही अशी आणि अनेक कारणे असतात दारू पिण्याची व नशा करण्याची , गरीब लोक पेताडे असतात अस म्हणतात आणि coprorate वाले social drinker असतात पण दोघेही दारू पीत असतात .    coprorate वाले social drink म्हणजे काही थंडाई आणि साबुदाने वडे खात नसतात . हल्ली मुल -मुली १०-१२ झाली नाही कि सिगरेट दारू भसा- भस ओढायला लागतात , गांजा काय , चरस काय , गर्दा काय , जर्दा काय , इंजेक्शन काय , LSD काय , व्हाईट नर काय , iodex काय , ब्रावून शुगर , कोकेन ,हेरोइन काय आणि अजून काय काय यादी वाढत जाते पण नशा  काही थांबत नाही ना नशा उतरत नाही ती वाढत जाते आणि चढत जाते .
             पालकांनी ह्यात लक्ष घालवे ते तरी काय लक्ष घालणार बरेच पालक रात्री घरी येताना धडपडत येत असतात , तर ते काय समुपदेशन करणार मुलांचे ? चित्रपट , आणि सतत style , fashion ची झापड मुलांच्या डोळ्यावर असतात . चित्रपटात अमुक -अमुक नायक काय style ने दारू पितो , सिगरेट ओढतो , आपण पण करूया style म्हणून . तो नेमका काय करतो हे कुणी जावून पहिला आहे का ? उगीच काहीतरी अनुकरण करायचं आणि नंतर रडत बासायचं , आणि चित्रपटात दारू सिगरेट चा सीन आला कि खाली सूचना येते कि हे आरोग्यास अपायकारक आहे तरी आपण ते करतो आणि वर सबब देतो कि त्याची "अक्षरे बारीक आहेत ती नीट दिसत नाही " पण सिगरेटच्या पाकिटावरील लहान अक्षरात लिहलेला flavour चा font बरा दिसतो  .
            नशा आणि व्यसन ह्या विषयी किती लहिले तरी अपुरे आहे , काही गोष्टी लक्षात घ्या ' तंबाकू खाताना कोणत्या जनावरास पहिले आहे का ? ते हुंगत पण नाही ' माणसे मात्र किक बसते म्हणून ती चवीने खातात आणि कर्करोगाने मारतात . कोणता जनावर पाण्या ऐवजी दारू पिते? निसर्गाने आपली शरीर रचना इतकी चांगली केली आहे कि एक काटा जरी गुतला तरी आपल शरीर ते स्वीकारत नाही तर उगीच आपण हे नशेच विष का ओततोय शरीरात आणि नशा करून हप्त्या- हप्त्य्ने मृत्यू का ओढवून घेत आहोत . आज जागतिक व्यसन मुक्ती दिन आहे जरा विचार करा , "शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे त्याचा उकिरडा करू नका''.
 

____________ सागर शिंदे © 
 

Monday, 1 June 2015

लोकशाही

" लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य (for the people by the people of the people i.e democracy ) आज काही राज्याश्स्त्र ह्या विषयावर लिहायचा माझा मानस नाही .न मी काही राजकारणावर लिहणार आहे तस राज्याश्स्त्र आणि राजकारण हे कागदावर वेगळे असतात आणि प्रत्यक्षात वेगळे असतात.
          आज भारतात लोकशाही आहे हे शेंबड्या पोराला पण माहित असत , जे मी वर लिहले आहे ते मंजे लोकशाही हे सर्वाना माहित आहे पण त्याचा  उपयोग किती लोक करतात? आता आपल्याला दर ५ वर्षे झाली की  लोकप्रतिनिधी निवडून द्यावा लागतो. कोणासाठी ? आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ? आपल्यासाठी की जो प्रतिनिधी निवडून आला आहे त्यासाठी ? हेच आपल्याला नेमक माहित नसता?(माहित असत पण आपल्याला तस करायचं नसत ) त्यात ५ वर्षे त्यानी काही काम केले नाही की परत आपण ओरडत सुटतो, जनतेचा कोणी वाली नाही, हे सरकार बरोबर नाही ते सरकार बरोबर नाही , हय्नी पैसा खाल्ला, त्याने भ्रष्टाचार केला. आज कोथिम्बिरिचि जुडी घेताना आपण दहा वेळा विचार करतो आणि मत देतना एकदा पण नाही विचार करत सरसकट निवडून देतो. आणि आपल्यासाठी आपणच खड्डा खोदतो .
       १८ वर्षे पूर्ण झाली कि व्यक्ती मतदान करू शकते, मतदान करू शकते म्हणजे कोणाला मतदान करू शकते? कोणाला पण , कोणालाही करू देत ते महत्त्वाच नाही करते ते महत्त्वाच आहे आणि एक जन निवडून येतो ते महत्त्वाच आहे. हे अस असेल तर लोकशाही हि नावापुरती,  प्रत्यक्ष तर हि हुकुमशाही, राजेशाही , घराणेशाही असेल , ज्यावेळी आपण लोकप्रतिनिधी (System ) ला नाव ठेवत असतो त्यावेळी एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून आपण काय करतो.
            आज खूप लोक असे आहेत की निवडणूकीला खेळ समजत असतात , त्यांना त्यावेळी पैसा दिसत असतो कोणता उमेदवार किती पैसे वाटणार ? किती खर्च करणार , त्यावेळी पैसे मिळत हि असतील काही लोकांना पण ते किती दिवसासाठी मग एकदा सत्ता हातात आल्यानंतर , भ्रष्टचार होणारच !
इथे भ्रष्टाचाराला खतपाणी आपण घालायचं आणि ते झाड फोपावला की तोड्याला आपण जायचा , तोड्याच्या आधी त्याची मुळे इतकी खोल रुतली असतात कि तोडले तरी भ्र्ष्टचारचे रोप पुन्हा येते.
     लोकप्रतिनिधी हा आपला माणूस आहे आपण निवडून दिला आहे तर एक सामान्य , नागरिक म्हणून व्यथा मांडणे हे आपले काम आहे ते बरीचशी लोक करत नाहीत. आणि मग ह्याला त्याला दोष देत बसतात. लोकशाहीतील प्रतिनिधी हा कधीच कोणाचा राजा नसतो तर तो जनतेचा सेवक असतो , पण काही लोक उगीच त्यांना अवास्तव महत्त्व देतात. प्रत्येक गल्ली , गावात एक भाई , दादा, शेठ, काका, मामा असतो आणि त्य्च्यामागे पोरंचा लवाजमा असतो, हळू हळू त्याचा उध्द्धार होत असतो. आणि पोरांच्या हातात ठेंगा असतो. आणि हळू हळू ते त्याच्या प्रेमळ आणि आर्थिक दबावाखाली जातात आणि त्यांना तोच राजा वाटू लागतो आणि तारणहार वाटू लागतो . इतका की  त्याचे मंदिर स्थापायचे बाकी असते.
         तो जर निवडून आला आहे तर त्याने आपले काम केले की , नाही आपला प्रदेशाचा किती विकास केला? किती रोजगार मिळवून दिला? किती शाळा - महाविद्यालये काढली? ह्या सारखे प्रश्न पडत नाहीत आणि पडले तरी बर्याच जणांना ते महत्वाच वाटत नाही जे हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात त्यांना हे करू देत नाहीत न जाब विचारू देत नाहीत. ह्या प्रकारे गुंता वाढत जातो आणि तो सुटता सुटत नाही.
          परवा  मी एक पोस्त केली होती " खासदार निधी न वापरलेले खासदार" त्याची खूप कमी जणांनी दखल घेतली, दखल घेतली नाही घेतली हे फारस महत्त्वाच नाही. पण किती जणांनी" खासदारजी " ना  विचारले , पत्र लिहिले , फोन केले , अगदी नगण्य असतील . पण जर ती पोस्ट कोणता Bollywood star असता, Cricket player  असता तर हजारो SMS गेले असते . ह्याला म्हणतात हातच सोडून पळत्याच्या मागे धावणे .
  ही परिस्थिती केवळ जनता बदलू शकते. कारण भारतीय लोकशाही ही रामराज्य देईल की नाही माहित नाही पण "सुराज्य" नक्की देईल. शेवटी काय
          
“If you want to change the system you have to be in system”


_____________________  सागर शिंदे

Tuesday, 19 May 2015

माणसाची मोजणी




माणसाची मोजणी
           लहानपणापासून एक विधान नेहमी ऐकत असतो " वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा " आता हे विधान नेमके कुणाचे हे आठवत नाही पण मला असं सांगणारे हे नेहमी कडक वेषात आणि सतत लवाजमा सोबत असणारे आणि बक्कळ पैसा घेवून मिरवणारे असत, हे सगळ असतना कुठे आला वेष बावळा आणि कुठे आल्या नाना कळा . हे मात्र नक्की आहे कि ह्यंचा पैसा पाहून ज्या लोकांकडे तो नाही त्यना तो पाहून नक्कीच पोटात कळा येत असाव्यात. त्यावेळी कुठेतरी जाणवल की लोक माणसाची मोजणी पैसा ह्या प्रकारात करतात. एक म्हण आहे ' बळी तो कान पिळी ' म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो काहीही करू शकतो असा गैरसमज लोकच समाजात पसरवत असतात .
          तो अमका अमका आहे न त्यच्याकडे रग्गड पैसा आहे. खूप दिलदार माणूस आहे . आपला खास मित्र आहे . ह्या प्रकारची विधाने आपसूकच तोंडातून बाहेर पडतात. एकीकडे उगीच गावगप्पा माऱ्याच्या की बंधुता, समता , एकोपा हेच खूप महत्तवाचे अंग आहेत जे मानवला सुखी ठेवतात आणि जिकडे पैसा दिसेल तिकडे उड्या मारत सुटायच्या अशी मानसिकता बनत चालली आहे आज काल . हे माणसा- माणसात आहे ते ठीक आहे पण पैसा ह्या गोष्टीने देव पण नाही सोडला . अमक्या अमक्या दिवशी आम्ही " बालाजी" ला गेलो होतो , हजारो रुपये खर्च आला , आम्ही पैसे मोजले आणि दर्शन घेतले लवकर आणि चांगले दर्शन झाले. अहो नुसते पैसा मोजा सगळ्या सुख-सोई तुम्हाला भेटत असतात. जाताना येताना विमानाने प्रवास केला. काही जण म्हणतात "शिर्डी " ला गेलो होतो " पंढरपूर" ला गेलो होतो , हज ला गेलो होतो , अमुक तमुक trvael agency  बरोबर अष्टविनायक , चार धाम केले सगळे केले पण भरपूर पैसे खर्च केले. हेच लोक कधी असे बोलत नाही की  आम्ही शेतातल्या म्हसोबाला जायला वेळ नसतो (काही रोज जात असतील ही ) गावदेवी ला जायला वेळ नसतो. कारण तिथे पैसा लागत नाही आणि ते देव फेमस नाहीत.
        लोक बोलतात भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, इथे हेच लोक देवाचं दर्शन व्हावं म्हणून पैसा देतात , तर अश्या लोकांकडून काय अपेक्षा करणार भ्रष्टाचार संपवण्याची ? देव हे खूप मोठे श्रद्धा स्थान आहे तिथे लोक लाच देतात मग ते सरकारी कामात लाच देणारच फरक इतकाच आहे की "देवळात देव लाच मागत नाही लोक देतात " सरकारात किंवा सामान्यतः  सगळीकडे लाच मागितली जाते आणि नाही मागितली तरी काम पूर्ण व्हावे म्हणून देणारे महाभाग खूप असतात ह्य्लाच म्हणतात पैश्याची मस्ती .
      पैसा हा ज्यचा- त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे , कुणी कसा कमवावा कसा खर्च करवा हे ज्याने - त्याने ठरवावे , कमवलेल्या पैश्याचा उपभोग पण घ्यावा, पण पैसा आला म्हणून खूप हुरळून जावू नये, किंवा अंगात मस्ती येवू नये , तुम्ही पैशाय्ने माणूस विकत घेवू शकता माणुसकी नाही , तुम्ही पैशाय्ने घर विकत घेवू शकता शांती नाही, तुम्ही पैश्याने पलंग घेवू शकता शांत झोप नाही , तुम्ही पैश्याने सगळ काही घेवू शकता पण " आनंद आणि समाधान " कधीच विकत घेवू  शकत नाही .
         ९९% मानवी गरजा हा पैसाच पूर्ण करू शकतो , पण मानवी गरजा किती आणि का ? हे फक्त  माणूस ठरवू शकतो. माणसाकडे पैसा नसला कि तो हिरमुसतो, नशिबाला , देवाला दोष देत बसतो . मात्र  अश्यावेळी तो मनाचे समाधान आणि मनशांती हरवून बसतो . आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा वाटत फिरतो आणि सुख शोधत आसतो.
          आपण पहिले माणसाचे मोजमाप पैसा ह्या फुटपट्टी ने करण बंध केले , पाहिजे गरजा प्रमाणात ठेवल्या पाहिजेत , म्हणजे वाईट वाटणार नाही , जरी खूप पैसा आला तर तो साठवला पाहिजे आणि इतरना मदत करून त्यांना पण धनवान बनवले पाहिजे (आर्थत जास्त नुकसान न होता ) शेवटी काय " जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे " आणि मनशांती - समाधान हेच खरे दागिने आहेत .
         पहा विचार करा, जमल तर आचरणात आणा ………।


सागर शिंदे @  

Thursday, 14 May 2015

Shambhuraje



Today is a 14th May, it is a very important day in a life of every human being, why this day is important? This is a born day of “Shambhuraje “I think it is not require to tell anyone who is he? But unfortunately due to class system new generation people are not aware about him.
          Those who are born in this soil it not require to tell them who is Shambhuraje , let’s focus on a history of Shambhuraje

1)      He was a son of Great King Shivaji raje.
2)      He was born on 14th May 1657.
3)       His mother died when he was two years of old.
4)       At the age of 9 he becomes a head of 4000 soldiers
5)      At the age of 10 he went to Agra along with his father to meet Aurangjeb
6)      At the age of 11 he becomes a head of 5000 soldiers.
7)      At the age of 13 he gave honor to “Rayyapa Mahar ”  (from bhujan commitee)in darbar
8)      At the age of 14 he wrote a book (granth) “Kavibhudbhushnam” in sanskruit language. And sant Dyaneshwar wrote bhavarthdeepika at the age of 16.
9)      At the age of 15 he wrote more three books
10)  He was a master of Sanskruit, Marathi, Hindi, gujrathi and all languages of the people who were in India for a business purpose.
11)  At the age of 16 he becomes a head of 10000 soldiers.
12)  He helped Shivaji raje to complete a mission of Fonda fort at the age of 17
13)  At the age of 18 he became a 1st princes of Shivaji raje .
14)  At the age of 19 he has started a 1st Palkhi of Sant tukaram Maharaj from Dehu to Pandharpur
15)  At the age of 23rd he becomes a Second Chatrapati (King) after Shivaji maharaj
16)  From the age of 23rd to 32 he fought with, British, Portuguese, Dutch, Mugaul , French .
17)    At age of 32 he scarifies himself for Nation.  


So this is just a small introduction of Shambhuraje , it is not everyone’s cup of tea to understand a Shambhuraje easily , for that it is require to have a more power in your muscle and sharp brain with a respect of mother land.

        From the age of 9to 32, he was troubling for a nation. What we are doing in this period?   I’m not talking about them who are in an age group of 9-20; according to current system children’s are busy in primary education. What about a people those who are in an age group of 20-30 and 30-40? Those who are in 20-25 they are busy in searching of a job and busy in roaming with girlfriend or they are busy in bar along with a bottle of beer and IPL matches. Why they should think anything about country? Those who are in 25-30 they are busy in marriage life and in job also them building a palace of dreams in their mind, those who are in 35-40 they are busy in a job promotions and busy in a future making of children.
         This is a current condition of youth in our country, so how it is possible to make a revolution? Those who are from Maratha family they have a proud about Shivaji raje and shambhuraje (rather everyone has a proud about them) but these people has extra proud about them. While going inside a bar I don’t understand how they loose a respect about ‘Maharaj ‘instead of spending a money and time in a mall why they do not go on a fort and help people to maintain a memories of our culture and Nation?
Why these people are not interested to go for a higher education and help people through that education. Why they are always crying the system is wrong, instead of crying why they are not trying to be a part of system and makes a necessary changes in system.  
     There are some of the youth groups who follow a thinking and act of Shivaji raje and Shambhuraje, How many youths are interested to join them and work with them?
It is not only requiring reading ‘Raje’ also important to understand. At least try to work like Raje according to today’s system. India is country of youth.
 
           I’m not a very great writer or philosopher. I’m a common youth man like other citizen of Nation but I’m inspired by a thinking of Shivajiraje and Shambhuraje. This country needs a change. These people want a Shivrajya (according to current system) only youth has a great power to do this, please take a motivation from Raje and make a change in this country.
          I’m requesting to all parents if you think your son should become a Shambhuraje,
Please read and understand “Shahaji Raje , Rajamata jijau , Shivaji raje” and read correct history of Maratha and educate this to your child , he or she will never go on a wrong track. If all parents do the same thing with a short period of time India will become a superpower and again there will be a voice of “Shivshambhuraja” from a valley of Sahyadri.

    (some lines from Maharashtra  geet)

Bhiti na ammha tuzi muli hi gadgadnarya nabha
Aasamanchya sultanila javab deti jivha
Sahyadricha simvha garjato
Shivshambhuraja


Jai Bhavani
Jai jijau
Jai Shivaji
Jai Shambhuraje





Written By,

Sagar Shinde (Scindia )

          

Thursday, 4 September 2014

पाउस एक सिनेमा!

 
 
                                                           पाउस एक सिनेमा!
 
 
 
 
जगात पूर्णपणे ७ खंड आहेत, ज्याची त्याची एक वेगळीच खासियत आहे. आपण आशिया खंडात येतो तर आपली पण एक वेगळी खासियत आहे. तस पहिले तर आपण समशीतोष्ण कटीबंधातले आपल्यकडे खूप मजा असते, सुंदर नटलेला निसर्ग असतो, कुठे उष्ण तर कुठे हुडहुडी भरणारी थंडी, तर कुठे नुसता गाळ आणि दलदल. मी काही भूगोलाचा पाठ नाही लिहित आहे किंवा निबंध नाही लिहित आहे.
       आपल्या बर्याच पाशिमात्य टाळक्य्ना इथे पण खूप दर्जेदार सृष्टी सौंदर्य आहे! हे नमूद करण्यासाठी चा हा प्रपंच, त्यांना फक्त spring दिसतो आणि winter दिसतो मन मोहित व्हायला, आपल्याकडे एक च आहे जो सगळा डाव मांडतो पण आणि मोडून पण टाकतो, तो म्हणजे "मान्सून" नुसता नाव जरी ऐकलं तरी अंगावर एक शहरा येतो, मन उत्साही होतं, थुई थुई नाचावसं वाटतं,हा फक्त काही मानवी मनाला भुलवत नाही तर सगळ्या सृष्टीला भुलवतो. हा जसा येतो तसा एक सिनेमा चालू झाला आहे असा वाटत, येतो तेव्हा वारा घोंघावत येत असतो,म्हणजे जणू काही सिनेमाचे शीर्षक गीत चालू झाले आहे. हळू हळू ढग आकाशात गर्दी करू लागतात. अस वाटते की कलाकार आणि इतर सिनेमा चामुंची नावे येत आहेत. रखरखता उन्ह जावून गार सावली आली असते,वर डोके गार वाटत असते पण खाली पाय मात्र उह्नाने तळपत असतात, जस काही चित्रपटात एक लहान कोळश्याच्या खाणीवर काम करणारा मुलगा,मोठा होत असतो.
          इथेच गोष्ट थांबत नाही, त्या थंड सावलीमध्ये सुद्धा एक मातीचा करपट वास येत असतो, मध्येच उन्ह येते,लगेच सावली येते,जस काही चित्रपटात छोट्या हिरोचा बाप शेवटच्या घटका मोजत असतो आता जाईल की मग जाईल?वाऱ्याचा वेग जर मंदावलेला असतो, जसा सिनेमा मध्ये मध्ये कंटाळवाणा वाटत असतो. परत सावली दाट होत जाते आणि वारा जरा जोरात सुटतो, पुन्हा तेच जणू काही नायक कसा घडत आहे हे चित्रपटात दाखवतात तसे? आणि इतक्यात काहीतरी अंगावर पडते टाप!टाप! आणि एकदम अंग शहारून येते, मातीचा सुगंध दरवळतो.असा वाटते की मुठभर का होईना पण माती खावी जस एखाद "आयटम सॉंग" चालू असत सिनेमा मध्ये, वारा अजून जोराने वाहू लागतो, सैरा वैरा पळत राहतो, दोन चार झाडे पडतो, घराची कौले,पत्रे, उडवून लावतो आणि, पाऊस टपोरे थेंब घेवून जोरात बरसू लागतो, कुठे दारू चे पेग भरले जातात तर कुठे चहा उकळाला जातो
इतक्यात एक थेंब पेग मध्ये पडतो आणि एक थेंब चहा मध्ये पडतो टाप! टाप जणू काही सिनेमा चा इंटर्वल होत असतो.
                 हा असा जोरात बरसत असतो की, नुसते लोक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळत असतात,कुणी आसरा शोधत असत तर कुणी आपल समान भिजू नये म्हणून सामानसकट पळत असते कुणी, तर कुणी पावसात नुसता भिजत असत आणि उह्नाचा शीण घालवत असत, लहान पोरे उड्या मारू मारू नाचत असतात, तितक्यात कुठून तरी एक दुपट्टा उडत उडत येतो आणि नायकाच्या तोंडावर येवून चिकटतो तो दुपट्टा बाजूला करणार तोच एक गोड सुंदर तरुणी त्याच्या समोर उभी असते हा तिच्या डोळ्यात हरवून जातो आणि गाणे सुरु होते.
              इतक्यात गाणे चालू असताना ढगांचा गडगडाट होतो, कुणीतरी लहान मुलगा ओरडत येतो की त्याच्या घरात गुंड घुसले आहेत. तो तसाच पळतो घरी, तो पुढे नायिका त्याच्या मागे! तो गुंडांना जोर जोरात बदडतो इकडे माती ओली होवून चिखल जमा झालेला असतो.टपोरे थेंब अजून पडत असतात, तो नायिकेच्या मनात भरतो, परत गाणे चालू होते आता ती वेळ आली असते. नायक नायिका दोघे भटकत असतात आणि इतक्यात विजांचा कडकडाट हो ढगांचा गडगडाट होतो, नायिका नायकाला बिलगते आचानक कोण तरी नायकावर हल्ला चढवते हा जोरात त्याला आपटतो, नायिका घाबरते, दोन जन तिच्या रोखाने येत असतात हा त्यांना पण बदडतो.५-१० मिनिट मारामारी होते पावसाचा जोर कमी झाला असतो, पोलिस येतात आणि गुंडांना पकडून नेतात,
            पाउस थांबतो, बाजूला खड्ड्यात पाणी साठले असते आणि त्यात एक कैरी पडते! टपक!टपक! इकडे चित्रपट संपतो तिकडे पाउस संपतो..................!!!!!!! पुढच्या शो साठी.

Tuesday, 2 September 2014

Cyber crimes





Cyber crimes in Maharashtra and India

Computer is the one kind of device which had change entire lifestyle of human being, before arrival of the computer there was no any option to perform any task or any work without manual or animal help, since last three decades, everything has changed and human life becomes efficient and automatic.
In the year of 1960 the invention of Internet has been occurred and in the 1992 internet was opened to people and now days so many people are using internet,devices are differ from each other like from Super computer to smartphone everywhere there is a internet, it is a golbal system which floats information from one computer to another computer in short the information is just a 'single click away' No need to stand in a que for ticket booking of railway,air,cinema,event etc. it is online, no need to stand in a departmental store for shopping you can buy or sell anything online, no need to go in a bank to do banking transaction, bank is just click away, no need to write an email or letter to friend they are always online through social networking, no to for fund transfer form one country to other, in short internet has made entire world as a global village. It is not mandatory that everyone should have a computer to do this task you can do it form your smartphone also.
So many people are known about benefits of internet but very few people are aware about crime through internet and through computer, all kinds of online and internet related crimes comes under cyber crime. There are few points which are focused on cyber crime in India.

  1. Hacking:
Hacking is the simple term which means to log in to others computer without his/her consent or give illegal commands to computer via remote access or through manual mode. It is also called as cracking of the system, every act committed to breaking of the computer or network is called as hacking, mostly hackers use ready made programs or written programs to attack others computer, and they get access of other computers and personal information, they uses this information for monetary gain, some hackers capture the information of your credit card, debit card, online banking, etc, they utilize it for withdrawal of money form others account, transfer of fund from one account to other account. Government and military websites are top targets of hackers.

  1. Child Pornography :
Internet is the highly useful medium by accused to reach and abuses children mentally and sexually, child pornography is rapidly increasing in India. Basically the facility of internt is easily available in metro cities of India and more children are using internt and become victims of child pornography.

3)Cyber Stalking :
Cyber stalking would be a repeated act of harassment or threating behavior of the criminal towards the victim through internet services,such as making phone calls, killing the pet of victim,send an abuse emails on frequent basis, desire of stalker to control and destroy the life of victim,
cyber stalking cases are finding in love matter,extra martial affairs, mostly girls are victim and boys are accused in this cases.

4)Denial of service attack:
In this act criminal gets a bandwidth of victims network or fill his/her mailbox with spam or junk mail, Dos (Disc operating system) attack, ping attack also comes under denial of service attack.




5)Virus Dissemination:
Software by email attack on victims computer/device such as virus, Trojan horse, time bomb,logic bomb, rabbit etc.


    1. Software piracy :
      Theft softwares, illgal copying of original and geniune progrmas, and distribution of this software and program in open market without consent of progrmaer or publisher of software.

7)IRC crime :
Internet relay chat is the server which has a chat rooms in which people from anywhere in the world gather and chat with each other.

      1. Credit card farud :
        Misuse of otherts credit card information or card to buy some thing or goods without owners consent.
      2. Net Extortion:
        Copying a confidational data of the company and extort said company for huge amount of money.
      3. Phishing :
        The act od sending emails to victim to claiming something for him like lottery,
        luckey draw, job opening etc and ask his personal infromation like Bank account number, password of net banking credit card information, is called as a internet phishing