Thursday, 4 September 2014

पाउस एक सिनेमा!

 
 
                                                           पाउस एक सिनेमा!
 
 
 
 
जगात पूर्णपणे ७ खंड आहेत, ज्याची त्याची एक वेगळीच खासियत आहे. आपण आशिया खंडात येतो तर आपली पण एक वेगळी खासियत आहे. तस पहिले तर आपण समशीतोष्ण कटीबंधातले आपल्यकडे खूप मजा असते, सुंदर नटलेला निसर्ग असतो, कुठे उष्ण तर कुठे हुडहुडी भरणारी थंडी, तर कुठे नुसता गाळ आणि दलदल. मी काही भूगोलाचा पाठ नाही लिहित आहे किंवा निबंध नाही लिहित आहे.
       आपल्या बर्याच पाशिमात्य टाळक्य्ना इथे पण खूप दर्जेदार सृष्टी सौंदर्य आहे! हे नमूद करण्यासाठी चा हा प्रपंच, त्यांना फक्त spring दिसतो आणि winter दिसतो मन मोहित व्हायला, आपल्याकडे एक च आहे जो सगळा डाव मांडतो पण आणि मोडून पण टाकतो, तो म्हणजे "मान्सून" नुसता नाव जरी ऐकलं तरी अंगावर एक शहरा येतो, मन उत्साही होतं, थुई थुई नाचावसं वाटतं,हा फक्त काही मानवी मनाला भुलवत नाही तर सगळ्या सृष्टीला भुलवतो. हा जसा येतो तसा एक सिनेमा चालू झाला आहे असा वाटत, येतो तेव्हा वारा घोंघावत येत असतो,म्हणजे जणू काही सिनेमाचे शीर्षक गीत चालू झाले आहे. हळू हळू ढग आकाशात गर्दी करू लागतात. अस वाटते की कलाकार आणि इतर सिनेमा चामुंची नावे येत आहेत. रखरखता उन्ह जावून गार सावली आली असते,वर डोके गार वाटत असते पण खाली पाय मात्र उह्नाने तळपत असतात, जस काही चित्रपटात एक लहान कोळश्याच्या खाणीवर काम करणारा मुलगा,मोठा होत असतो.
          इथेच गोष्ट थांबत नाही, त्या थंड सावलीमध्ये सुद्धा एक मातीचा करपट वास येत असतो, मध्येच उन्ह येते,लगेच सावली येते,जस काही चित्रपटात छोट्या हिरोचा बाप शेवटच्या घटका मोजत असतो आता जाईल की मग जाईल?वाऱ्याचा वेग जर मंदावलेला असतो, जसा सिनेमा मध्ये मध्ये कंटाळवाणा वाटत असतो. परत सावली दाट होत जाते आणि वारा जरा जोरात सुटतो, पुन्हा तेच जणू काही नायक कसा घडत आहे हे चित्रपटात दाखवतात तसे? आणि इतक्यात काहीतरी अंगावर पडते टाप!टाप! आणि एकदम अंग शहारून येते, मातीचा सुगंध दरवळतो.असा वाटते की मुठभर का होईना पण माती खावी जस एखाद "आयटम सॉंग" चालू असत सिनेमा मध्ये, वारा अजून जोराने वाहू लागतो, सैरा वैरा पळत राहतो, दोन चार झाडे पडतो, घराची कौले,पत्रे, उडवून लावतो आणि, पाऊस टपोरे थेंब घेवून जोरात बरसू लागतो, कुठे दारू चे पेग भरले जातात तर कुठे चहा उकळाला जातो
इतक्यात एक थेंब पेग मध्ये पडतो आणि एक थेंब चहा मध्ये पडतो टाप! टाप जणू काही सिनेमा चा इंटर्वल होत असतो.
                 हा असा जोरात बरसत असतो की, नुसते लोक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळत असतात,कुणी आसरा शोधत असत तर कुणी आपल समान भिजू नये म्हणून सामानसकट पळत असते कुणी, तर कुणी पावसात नुसता भिजत असत आणि उह्नाचा शीण घालवत असत, लहान पोरे उड्या मारू मारू नाचत असतात, तितक्यात कुठून तरी एक दुपट्टा उडत उडत येतो आणि नायकाच्या तोंडावर येवून चिकटतो तो दुपट्टा बाजूला करणार तोच एक गोड सुंदर तरुणी त्याच्या समोर उभी असते हा तिच्या डोळ्यात हरवून जातो आणि गाणे सुरु होते.
              इतक्यात गाणे चालू असताना ढगांचा गडगडाट होतो, कुणीतरी लहान मुलगा ओरडत येतो की त्याच्या घरात गुंड घुसले आहेत. तो तसाच पळतो घरी, तो पुढे नायिका त्याच्या मागे! तो गुंडांना जोर जोरात बदडतो इकडे माती ओली होवून चिखल जमा झालेला असतो.टपोरे थेंब अजून पडत असतात, तो नायिकेच्या मनात भरतो, परत गाणे चालू होते आता ती वेळ आली असते. नायक नायिका दोघे भटकत असतात आणि इतक्यात विजांचा कडकडाट हो ढगांचा गडगडाट होतो, नायिका नायकाला बिलगते आचानक कोण तरी नायकावर हल्ला चढवते हा जोरात त्याला आपटतो, नायिका घाबरते, दोन जन तिच्या रोखाने येत असतात हा त्यांना पण बदडतो.५-१० मिनिट मारामारी होते पावसाचा जोर कमी झाला असतो, पोलिस येतात आणि गुंडांना पकडून नेतात,
            पाउस थांबतो, बाजूला खड्ड्यात पाणी साठले असते आणि त्यात एक कैरी पडते! टपक!टपक! इकडे चित्रपट संपतो तिकडे पाउस संपतो..................!!!!!!! पुढच्या शो साठी.

No comments:

Post a Comment