" लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य (for the people by the people
of the people i.e democracy ) आज काही राज्याश्स्त्र ह्या विषयावर
लिहायचा माझा मानस नाही .न मी काही राजकारणावर लिहणार आहे तस राज्याश्स्त्र
आणि राजकारण हे कागदावर वेगळे असतात आणि प्रत्यक्षात वेगळे असतात.
आज भारतात लोकशाही आहे हे शेंबड्या पोराला पण माहित असत , जे मी वर लिहले आहे ते मंजे लोकशाही हे सर्वाना माहित आहे पण त्याचा उपयोग किती लोक करतात? आता आपल्याला दर ५ वर्षे झाली की लोकप्रतिनिधी निवडून द्यावा लागतो. कोणासाठी ? आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ? आपल्यासाठी की जो प्रतिनिधी निवडून आला आहे त्यासाठी ? हेच आपल्याला नेमक माहित नसता?(माहित असत पण आपल्याला तस करायचं नसत ) त्यात ५ वर्षे त्यानी काही काम केले नाही की परत आपण ओरडत सुटतो, जनतेचा कोणी वाली नाही, हे सरकार बरोबर नाही ते सरकार बरोबर नाही , हय्नी पैसा खाल्ला, त्याने भ्रष्टाचार केला. आज कोथिम्बिरिचि जुडी घेताना आपण दहा वेळा विचार करतो आणि मत देतना एकदा पण नाही विचार करत सरसकट निवडून देतो. आणि आपल्यासाठी आपणच खड्डा खोदतो .
१८ वर्षे पूर्ण झाली कि व्यक्ती मतदान करू शकते, मतदान करू शकते म्हणजे कोणाला मतदान करू शकते? कोणाला पण , कोणालाही करू देत ते महत्त्वाच नाही करते ते महत्त्वाच आहे आणि एक जन निवडून येतो ते महत्त्वाच आहे. हे अस असेल तर लोकशाही हि नावापुरती, प्रत्यक्ष तर हि हुकुमशाही, राजेशाही , घराणेशाही असेल , ज्यावेळी आपण लोकप्रतिनिधी (System ) ला नाव ठेवत असतो त्यावेळी एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून आपण काय करतो.
आज खूप लोक असे आहेत की निवडणूकीला खेळ समजत असतात , त्यांना त्यावेळी पैसा दिसत असतो कोणता उमेदवार किती पैसे वाटणार ? किती खर्च करणार , त्यावेळी पैसे मिळत हि असतील काही लोकांना पण ते किती दिवसासाठी मग एकदा सत्ता हातात आल्यानंतर , भ्रष्टचार होणारच !
इथे भ्रष्टाचाराला खतपाणी आपण घालायचं आणि ते झाड फोपावला की तोड्याला आपण जायचा , तोड्याच्या आधी त्याची मुळे इतकी खोल रुतली असतात कि तोडले तरी भ्र्ष्टचारचे रोप पुन्हा येते.
लोकप्रतिनिधी हा आपला माणूस आहे आपण निवडून दिला आहे तर एक सामान्य , नागरिक म्हणून व्यथा मांडणे हे आपले काम आहे ते बरीचशी लोक करत नाहीत. आणि मग ह्याला त्याला दोष देत बसतात. लोकशाहीतील प्रतिनिधी हा कधीच कोणाचा राजा नसतो तर तो जनतेचा सेवक असतो , पण काही लोक उगीच त्यांना अवास्तव महत्त्व देतात. प्रत्येक गल्ली , गावात एक भाई , दादा, शेठ, काका, मामा असतो आणि त्य्च्यामागे पोरंचा लवाजमा असतो, हळू हळू त्याचा उध्द्धार होत असतो. आणि पोरांच्या हातात ठेंगा असतो. आणि हळू हळू ते त्याच्या प्रेमळ आणि आर्थिक दबावाखाली जातात आणि त्यांना तोच राजा वाटू लागतो आणि तारणहार वाटू लागतो . इतका की त्याचे मंदिर स्थापायचे बाकी असते.
तो जर निवडून आला आहे तर त्याने आपले काम केले की , नाही आपला प्रदेशाचा किती विकास केला? किती रोजगार मिळवून दिला? किती शाळा - महाविद्यालये काढली? ह्या सारखे प्रश्न पडत नाहीत आणि पडले तरी बर्याच जणांना ते महत्वाच वाटत नाही जे हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात त्यांना हे करू देत नाहीत न जाब विचारू देत नाहीत. ह्या प्रकारे गुंता वाढत जातो आणि तो सुटता सुटत नाही.
परवा मी एक पोस्त केली होती " खासदार निधी न वापरलेले खासदार" त्याची खूप कमी जणांनी दखल घेतली, दखल घेतली नाही घेतली हे फारस महत्त्वाच नाही. पण किती जणांनी" खासदारजी " ना विचारले , पत्र लिहिले , फोन केले , अगदी नगण्य असतील . पण जर ती पोस्ट कोणता Bollywood star असता, Cricket player असता तर हजारो SMS गेले असते . ह्याला म्हणतात हातच सोडून पळत्याच्या मागे धावणे .
ही परिस्थिती केवळ जनता बदलू शकते. कारण भारतीय लोकशाही ही रामराज्य देईल की नाही माहित नाही पण "सुराज्य" नक्की देईल. शेवटी काय
_____________________ सागर शिंदे

“If you want to change the system you have to be in system”
_____________________ सागर शिंदे
No comments:
Post a Comment